वाक्प्रचार MCQ Quiz in తెలుగు - Objective Question with Answer for वाक्प्रचार - ముఫ్త్ [PDF] డౌన్‌లోడ్ కరెన్

Last updated on Apr 3, 2025

పొందండి वाक्प्रचार సమాధానాలు మరియు వివరణాత్మక పరిష్కారాలతో బహుళ ఎంపిక ప్రశ్నలు (MCQ క్విజ్). వీటిని ఉచితంగా డౌన్‌లోడ్ చేసుకోండి वाक्प्रचार MCQ క్విజ్ Pdf మరియు బ్యాంకింగ్, SSC, రైల్వే, UPSC, స్టేట్ PSC వంటి మీ రాబోయే పరీక్షల కోసం సిద్ధం చేయండి.

Latest वाक्प्रचार MCQ Objective Questions

Top वाक्प्रचार MCQ Objective Questions

वाक्प्रचार Question 1:

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा -- खूणगाठ बांधणे. 

  1. ढोंगीपणा करणे
  2. मन घट्ट करणे
  3. निश्चय करणे
  4. गाठ मारून खून करणे

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : निश्चय करणे

वाक्प्रचार Question 1 Detailed Solution

उत्तर - खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा अर्थ निश्चय करणे हा होईल.

वाक्यात उपयोग - या परीक्षेत पहिल्या दहात यायचेच अशी साहिलने मनात खूणगाठ बांधली होती.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

Additional Information

  • मन घट्ट करणे म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करणे होय.
    • वाक्यात उपयोग - शत्रूने अचानक केलेल्या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी सर्व जवानांनी आपले मन घट्ट केले.

वाक्प्रचार Question 2:

पोटात दुखणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

  1. वेदना होणे
  2. वाईट वाटणे
  3. राग येणे
  4. असूया वाटणे

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : असूया वाटणे

वाक्प्रचार Question 2 Detailed Solution

उत्तर - पोटात दुखणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ असूया वाटणे हा होतो.

वाक्यात उपयोग - आपल्या मित्राने घेतलेली नवीन गाडी बघून सुरेशच्या पोटात दुखू लागले.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

Additional Informationवेदना होणे म्हणजे दुःखदायक जाणीव होणे होय.

खेद वाटणे म्हणजे वाईट वाटणे होय.

अंगाचा तिळपापड होणे म्हणजे राग येणे होय.

वाक्प्रचार Question 3:

चुकीच्या पर्याय निवडा.

  1. खडे फोडणे- कष्ट करणे
  2. खसखस पिकणे- मोठ्याने हसणे
  3. खो घालणे- विघ्न निर्माण करणे
  4. कंठस्नान घालणे-  ठार मारणे

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : खडे फोडणे- कष्ट करणे

वाक्प्रचार Question 3 Detailed Solution

वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो.

वरील दिलेल्या पर्यायांमध्ये खडे फोडणे - कष्ट करणे हा चुकीचा पर्याय आहे.

खडे फोडणे म्हणजेच दोष देणे. खापर फोडणे, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे असा होतो.

अशा प्रकारे वरील खडे फोडणे- कष्ट करणे हा चुकीचा पर्याय आहे.

वाक्प्रचार Question 4:

'एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे' या अर्थाचे वाक्प्रचार कोणते ?

(a) कानी कपाळी रडणे

(b) कानात बोटे घालणे

(c) कानाला खडा लावणे

(d) कानावर हात ठेवणे

  1. केवळ (a) आणि (c) बरोबर
  2. केवळ (b) आणि (d) बरोबर
  3. केवळ (a), (b) आणि (d) बरोबर
  4. केवळ (b), (c) आणि (d) बरोबर

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : केवळ (b) आणि (d) बरोबर

वाक्प्रचार Question 4 Detailed Solution

उत्तर- केवळ (b) आणि (d) बरोबर

वाक्प्रचार- वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो.

'एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे' या अर्थाचे वाक्प्रचार (b) कानात बोटे घालणे आणि (d) कानावर हात ठेवणे हे होतात.

वाक्प्रचार Question 5:

स्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार ओळखा.

  1. दिवे लावणे
  2. मातीत मिसळणे
  3. कामी येणे
  4. बारा वाजणे

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : कामी येणे

वाक्प्रचार Question 5 Detailed Solution

उत्तर - स्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. या वाक्यातील मृत्यू पावले या शब्दसमूहासाठी कामी येणे हा योग्य वाक्प्रचार होईल

स्पष्टीकरण:

"कामी येणे" या वाक्प्रचाराचा अर्थ "त्याग होणे किंवा मृत्यू होणे" असा होतो.
उदाहरणार्थ, "देशासाठी अनेक सैनिक कामी आले." म्हणजे "देशासाठी त्यांनी प्राणार्पण केले."

वाक्यातील "स्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले." याचा अर्थ "स्वातीचे पती युद्धात कामी आले." असा होतो, त्यामुळे "कामी येणे" हा वाक्प्रचार योग्य ठरतो.

इतर पर्यायांचे अर्थ:

  1. दिवे लावणे – मोठे नुकसान होणे किंवा मोठी हानी होणे.
  2. मातीत मिसळणे – पूर्ण नष्ट होणे किंवा नामशेष होणे.
  3. बारा वाजणे – अत्यंत कठीण परिस्थिती येणे किंवा संकटात सापडणे.

वाक्प्रचार Question 6:

'गाशा गुंडाळणे' वाक्यात उपयोग करा.

  1. त्याने गाशा गुंडाळला.
  2. तो गाशा गुंडाळत बसला.
  3. त्याला गाशा गुंडाळता येत नाही.
  4. त्याने गाशा गुंडाळताना चूक केली.

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : त्याने गाशा गुंडाळला.

वाक्प्रचार Question 6 Detailed Solution

उत्तर- त्याने गाशा गुंडाळला.

वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो.

वाक्प्रचाराचा अर्थ - गाशा गुंडाळणे म्हणजे एकाएकी निघून जाणे, एकदम पसार होणे.

उदा - श्यामने लग्नातून लवकरच गाशा गुंडाळला.

वरील दिलेल्याप्रमाणे गाशा गुंडाळणे' याचा वाक्यात वाक्यात उपयोग करताना त्याने गाशा गुंडाळला असे होते.

वाक्प्रचार Question 7:

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : जीव भांड्यात पडणे -

  1. संकट टळल्यामुळे बरे वाटणे.
  2. जीवन असुरक्षित असणे.
  3. जीव सांभाळणे.
  4. जीव कासावीस होणे.

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : संकट टळल्यामुळे बरे वाटणे.

वाक्प्रचार Question 7 Detailed Solution

उत्तर - जीव भांड्यात पडणे म्हणजे संकट टळल्यामुळे बरे वाटणे होय.

वाक्यात उपयोग - आपला मुलगा घरी सुखरूप पोहचताच आईचा जीव भांड्यात पडला.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

वाक्प्रचार Question 8:

‘घागरगडचा सुभेदार' या वाक्‍प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

  1. अकलेचा खंदक
  2. ठणठणपाळ
  3. चतुर्भुज होणे
  4. पाणक्‍या
  5. गडाचा सुभेदार

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : पाणक्‍या

वाक्प्रचार Question 8 Detailed Solution

वाक्प्रचार  : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असते.

घागरगडचा सुभेदार'- पाणक्‍या

पाणक्‍या- कावड हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन होय. घरोघरी कावडीने पाणी भरून उदर निर्वाह करणाऱ्यांना पाणक्या अथवा पाणेरी म्हणतात.

घागरगडचा सुभेदार - उगाच फुशारकी मारणारी व्यक्ती.

उदा.आपल्या शूरपणाच्या नवनवीन गोष्टी रचून सांगणारा सखाराम म्हणजे घागरगडचा सुभेदार होता.

वरील ‘घागरगडचा सुभेदार' या वाक्‍प्रचाराचा अर्थ पाणक्‍या असा होतो.

Additional Information

अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस.

ठणठणपाळ - विद्याहीन मनुष्य.

चतुर्भुज होणे - लग्न करणे.

वाक्प्रचार Question 9:

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

(a)

पाणी पडणे

(i)

आशा सोडणे

(b)

पाणी मुरणे

(ii)

पराभव करणे

(c)

पाणी पाजणे

(iii)

गुप्तकट शिजत असणे

(d)

पाणी सोडणे

(iv)

वाया जाणे

  1. (a) - (i), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (iii)
  2. (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
  3. (a) - (iii), (b) - (ii), (c) - (i), (d) - (iv)
  4. (a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

वाक्प्रचार Question 9 Detailed Solution

उत्तर- (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

वाक्प्रचार योग्य अर्थ
पाणी पडणे वाया जाणे
पाणी मुरणे गुप्तकट शिजत असणे
पाणी पाजणे
पराभव करणे
पाणी सोडणे आशा सोडणे

वाक्प्रचार Question 10:

पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

खाजवून खरूज काढणे - 

  1. रोगाला आमंत्रण देणे
  2. मुद्दाम कळ लावून भांडण काढणे 
  3. एकमेकांना रक्‍तबंबाळ करणे 
  4. उपकाराची जाणीव न ठेवणे 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : मुद्दाम कळ लावून भांडण काढणे 

वाक्प्रचार Question 10 Detailed Solution

खाजवून खरूज काढणे याचा अर्थ मुद्दाम कळ लावून भांडण काढणे किंवा मुद्दाम भांडण उकरून काढणे असा होतो.

वाक्यात उपयोग - रमेश नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या मित्रांच्यात खाजवून खरूज काढत असे.

Additional Informationवाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

खाल्ल्या मिठाला न जागणे याचा अर्थ उपकाराची जाणीव न ठेवणे असा होतो.

Get Free Access Now
Hot Links: teen patti joy 51 bonus teen patti yes teen patti game online