म्हणी MCQ Quiz in हिन्दी - Objective Question with Answer for म्हणी - मुफ्त [PDF] डाउनलोड करें

Last updated on Apr 4, 2025

पाईये म्हणी उत्तर और विस्तृत समाधान के साथ MCQ प्रश्न। इन्हें मुफ्त में डाउनलोड करें म्हणी MCQ क्विज़ Pdf और अपनी आगामी परीक्षाओं जैसे बैंकिंग, SSC, रेलवे, UPSC, State PSC की तैयारी करें।

Latest म्हणी MCQ Objective Questions

Top म्हणी MCQ Objective Questions

म्हणी Question 1:

'आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.' हा अर्थ संबोधित करणारी म्हण ओळखा.

  1. खोट्याच्या कपाळी गोटा
  2. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ
  3. टिटवी देखील समुद्र आटविते
  4. चिंती परा येई घरा

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ

म्हणी Question 1 Detailed Solution

उत्तर: कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ

स्पष्टीकरण: वरील म्हणी व त्यांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत:

1) खोट्याच्या कपाळी गोटा: वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.

२) कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ: आपल्या जवळचा व्यक्ती आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो असा आहे.

३) टिटवी देखील समुद्र आटविते: सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.

४) चिंती परा येई घरा: दुसर्‍याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वत:चेच वाईट होते.

उपरोक्त दिलेल्या म्हणी व त्यांच्या अर्थानुसार 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हण  'आपल्या जवळचा व्यक्ती आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो असा आहे.' हा अर्थ अचूक संबोधित करते.

म्हणी Question 2:

खालील म्हण पूर्ण करा.

'चुली पुढे शिपाई अन घराबाहेर ________'

  1. शिकारी
  2. कसाई
  3. भागूबाई
  4. गवई

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : भागूबाई

म्हणी Question 2 Detailed Solution

उत्तर - रिकाम्या जागी भागूबाई हा योग्य शब्द येईल.

चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई ही म्हण योग्य होईल.

चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने घरात तेवढा शूरपणा दाखवायचा पण बाहेर गेल्यावर घाबरायचे असा होतो.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

म्हणी Question 3:

खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा.

नागीण पोसली आणि .......... डसली.

  1. घरदाराला
  2. पोसणार्‍याला
  3. पाळणार्‍याला
  4. शेजार्‍यांना

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : पोसणार्‍याला

म्हणी Question 3 Detailed Solution

नागीण पोसली आणि पोसणार्‍याला डसली ही योग्य म्हण होईल.

Important Pointsनागीण पोसली आणि पोसणार्‍याला डसली याचा अर्थ वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच असा होतो.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

म्हणी Question 4:

खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो?

नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे

  1. कोणत्याही गोष्टीत निव्वळ फायदा बघणे
  2. देवाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचे पूर्ण गाव असते.
  3. देवाच्या नावाने स्वार्थ जपणे
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : देवाच्या नावाने स्वार्थ जपणे

म्हणी Question 4 Detailed Solution

म्हण  : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.

नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे याचा अर्थ जर एखादा व्यक्ती किंवा पुजारी देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना देवाची भीती दाखवून स्वतः च्या स्वार्थ साठी किंवा पैसे लुबाडण्यासाठी त्यांची फसवणूक करत असेल किंवा अंधश्रद्धेचा सहारा घेऊन स्वतः चा स्वार्थ जपत असेल तर त्यालाच म्हणतात देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.

अशा प्रकारे वरील देवाच्या नावाने स्वार्थ जपणे हा योग्य पर्याय आहे.

म्हणी Question 5:

दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 

- दृष्टीआड सृष्टी 

  1. दृष्टीत दोष असणे 
  2. दुर्लक्ष करणे 
  3. आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही 
  4. दृष्टीशिवाय आपणाला सृष्टी दिसू शकत नाही 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही 

म्हणी Question 5 Detailed Solution

म्हण- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.

दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही हा होतो.

म्हणी Question 6:

‘दीड हळकुंडात पिवळी' या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

  1. थोड्याशा यशाने हुरळून जाणे 
  2. दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत नसते
  3. एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे
  4. कोणतेही काम पूर्ण न करणे

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : थोड्याशा यशाने हुरळून जाणे 

म्हणी Question 6 Detailed Solution

उत्तर - दीड हळकुंडात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ थोड्याशा यशाने हुरळून जाणे हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ कोणतेही काम पूर्ण न करणे असा होतो.

म्हणी Question 7:

समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा.

a.

फुल ना फुलाची पाकळी

i.

पन्नास आचारी अन् वरणात मीठ भारी

b.

आठशे लष्कर अन् नवशे आचारी

ii.

चमडी जाय लेकीन दमडी न जाय

c.

तीन तिघाडा अन् काम बिघाडा

iii.

थोडक्यात नटावे अन् प्रेमाने भेटावे

d.

तो पाप देणार नाही तर पुण्य कसले देतो?

iv.

अंगापेक्षा मोठा बोंगा कुठे चालला सोंगा

  1. a - iii, b - i, c - iv, d - ii
  2. a - iii, b - iv, c - i, d - ii
  3. a - iv, b - iii, c - i, d - ii
  4. a - ii, b - iii, c - iv, d - i

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : a - iii, b - iv, c - i, d - ii

म्हणी Question 7 Detailed Solution

उत्तर- a - iii, b - iv, c - i, d - ii

स्पष्टीकरण-

म्हण समानार्थी म्हण
फुल ना फुलाची पाकळी थोडक्यात नटावे अन् प्रेमाने भेटावे
आठशे लष्कर अन् नवशे आचारी अंगापेक्षा मोठा बोंगा कुठे चालला सोंगा
तीन तिघाडा अन् काम बिघाडा पन्नास आचारी अन् वरणात मीठ भारी
तो पाप देणार नाही तर पुण्य कसले देतो? चमडी जाय लेकीन दमडी न जाय

म्हणी Question 8:

'रामभाऊंचे पैसे गोविंदरावाला आपले म्हणून देणे आणि गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे' हा आशय सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण कोणती ?

  1. हाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका
  2. शेरास सव्वा शेर
  3. पैसा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा
  4. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

म्हणी Question 8 Detailed Solution

म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. 

याठिकाणी दुसऱ्याचे पैसे आपले म्हणून तिसऱ्याला दिले आहेत यासाठी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देणे ही म्हण योग्य होईल.

Additional Informationहाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका म्हणजे डोक्‍याकडे धरावयास जावे तो टक्‍कल पडलेले असल्‍यामुळे धरण्यास केस इ. नसलेला व हातात धरावयास जावे तर रोड असल्‍यामुळे हातांतून सहज निसटणारा याप्रमाणे ज्‍याचे काहीच हातात लागणार नाही असा कफल्‍लक, निष्‍कांचन मनुष्‍य.

शेरास सव्वाशेर म्हणजे एकाला दुसरा वरचढ होणे.

पैसा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजे जशी मजुरी तसे काम. मजुरी, वेतन थोडे असेल तर कामही थोडेच अशी स्थिति असणे.

म्हणी Question 9:

'साखरेचे खाणार त्याला देव देणार' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

  1. साखर खाणारा माणूस सुखी राहतो.
  2. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणे
  3. जो वेळेवर हजर राहील त्यालाच फायदा मिळेल.
  4. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.

म्हणी Question 9 Detailed Solution

म्हण- संकल्पना

  • कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

 

'साखरेचे खाणार त्याला देव देणार' या म्हणीचा योग्य अर्थ 'भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.' असा होईल.

म्हणी Question 10:

पुढील म्हण पुर्ण करा - कामा पुरता मामा, ताकापुरती ______

  1. मामी 
  2. मावशी 
  3. आजी 
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : आजी 

म्हणी Question 10 Detailed Solution

उत्तर: आजी 

स्पष्टीकरण:

वरील म्हणीचे अर्थ:

1) कामा पुरता मामा - ताकापुरती आजी → आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.

Get Free Access Now
Hot Links: teen patti bliss rummy teen patti teen patti master download