तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले. 

This question was previously asked in
Maharashtra Zilla Parishad Junior Assistant Clerk (Nagpur) 2015 Official Paper
View all Maharashtra Zilla Parishad Junior Assistant Clerk Papers >
  1. महात्मा फुले
  2. अण्णासाहेब किर्लोस्कर
  3. विष्णुदास भावे
  4. आचार्य अत्रे

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : महात्मा फुले
Free
Maharashtra Zilla Parishad: ST 1: Logical Reasoning I (तार्किक तर्क I)
20 Qs. 40 Marks 25 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले. 

जोतीराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते. हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.

शेतकऱ्याचा असूड, सत्सार अंक १, सत्सार अंक २, इशारा, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, गुलामगिरी, अखंडादी काव्य रचना ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.

Additional Informationबळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’ या पहिल्या परिपूर्ण संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला.‘शांकरदिग्विजय’ हे त्याचं पहिलं गद्य नाटक. त्यांनी लगेचच महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाचे त्यांनी मराठी भाषांतर करायला घेतले. अण्णासाहेबांच्या नाट्य आणि काव्य गुणांची स्वतंत्र प्रतिभा दर्शवणारे त्यांचे नाटक म्हणजे ‘संगीत सौभद्र’. अण्णासाहेबांचे तिसरे नाटक रामराज्यवियोग.

विष्णूदास अमृत भावे हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो. इंद्रजित वध, राजा गोपीचंद, सीता स्वयंवर ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके आहेत. 

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखककवीनाटककारसंपादकचित्रपट निर्मातेशिक्षणतज्ज्ञराजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. अशी बायको हवी, उद्याचा संसार, पराचा कावळा, घराबाहेर कवडीचुंबक, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा ही त्यांची काही नाटके आहेत.

Hot Links: teen patti vungo teen patti refer earn teen patti joy vip teen patti pro